मिर्झापूर - रक्तलांच्छित सूडनाट्य
भारतीय ओ टी टी मार्केट वर सध्या मिर्झापूर सीजन २ ची धूम आहे . मिर्झापूर चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सीजन २ आता ऍमेझॉन प्राईम वर स्ट्रीम होतोय .नेटफ्लिक्स वरच्या सॅक्रीड गेम्सने भारतीय ओ टी टी कन्टेन्टला एक नवीन निर्णयक वळण दिले .दमदार लेखन,अभिनय ,दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेली ही सिरीज भारतीय प्रेक्षकांना चांगलीच आवडली. सर्वच वयोगटातले प्रेक्षक या वेब सिरीज ने ओ टी टी प्लॅटफॉर्म वर खेचले .क्राईम जॉनर ची हि लीगसी पुढे नेण्याचे काम मिर्झापूर सीजन १ ने केले. सध्या तरी ओ टी टी कंटेण्ट निर्मितीला अजून तरी सेन्सॉरची बंधने नसल्यामुळे दिग्दर्शक आणि कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्म वर खूपच स्वातंत्र्य घेतात त्यामुळे भाषा,न्यूडिटी आणि तत्सम कन्टेन्ट मध्ये कुठलेही पारंपरिक संकेत पाळले जात नाहीत .त्यामुळे हा कन्टेन्ट फॅमिली बरोबर पाहणे म्हणजे अवघडच .असो,तर मिर्झापूर सीजन २ आता धमाक्यात रिलीज झालाय आणि हिट हि ठरतोय . ज्या लोकांना क्राइम ड्रामा पसंद आहे त्यांच्यासाठीहि पर्वणीच आहे अर्थात पहिला सीजन पहिला असेल तर. पहिला सीजन प्रेक्षकाना क्लिफ हँगर मध्ये ठेऊनच संपला .त्यामुळे आता प्रेक्षकांचा प्रतिसाद दणक्यात लाभतोय .
मिर्झापूर यु पी मधलं एक शहर या शहरातील बेलगाम गुन्हेगारी चालू आहे , कायदा अस्तित्वात नसल्यातच जमा आहे .पोलीस ही गुन्हेगारांच्या पे रोल वरच काम करत आहेत. देशी कट्टे ,अफीम यांचा मुक्त व्यापार चाललाय. मिर्झापूर हे जणू एक जंगल आहे आणि हे जंगल एक प्रस्थापीत नियम मात्र कसोशीने पाळते तो म्हणजे बळी तो कानपिळी .ज्याच्याकडे जितका दारुगोळा तो तितका ताकदवान .या जंगलावर देशी कट्ट्याच्या व्यापाराच्या जोरावर कालीन त्रिपाठी मिर्झापूरवर राज्य करतोय . पण वडिलोपार्जित चालत असलेली मिर्झापूरची हि गादी राखून ठेवणे हे त्याच्यासाठी तितकं सोपे राहिलेलं नाहीये . कालीन भैयाच्या साम्राज्याला उद्धवस्थ करण्यासाठी गुड्डू पंडित आणि गोलू जंग जंग पछाडताएत त्यामध्ये शरद शुक्ला ची ही छुपी साथ त्यांना लाभते आहे .परंतु हि कहाणी इतकी सरळधोपट आणि साधी बिल्कुलच नाहीये .प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार आहेत प्रत्येक एपिसोडगणिक प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळे कंगोरे समोर येतात. मिर्झापूरच्या शहराची सत्ता आपल्या हातात यावी म्हणून उतावळा असलेला स्पॉईल्ड ब्रॅट मुन्ना त्रिपाठी आणि आपल्या मुलाला युवराज बनवण्यासाठी कुठलाही विधिनिषेध न बाळगणारी दुसरी बायको बीना त्रिपाठी ह्या सर्व जंजाळात फासलेला कालीन भैय्या बाहेर पडतो का ? बदल्याच्या आगीत जळणारे गुड्डू पंडित आणि गोलू आपल्या भावाचा व बहिणीचा बदला घेण्यात यशस्वी होतात का ? या प्रश्नांची उत्तरे मात्र सिरीज पाहिल्यानंतरच मिळतील प्रतिशोध,सत्ता , राजकारण , वासना , ह्या मानवी भावना आडपडदा न ठेवता आपल्या समोर येतात .दिग्दर्शन आणि लेखन या बदला नाट्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात .कलाकारांचा दमदार अभिनय हि या सिरीज ची जमेची बाजू . कालीन भैयाच्या च्या रोल मध्ये पंकज त्रिपाठी यांनी कमाल केली आहे अभिनयातलं सहजपण , भूमिकेवरची पकड यामुळे त्रिपाठो यांनी साकारलेला कालीन भैय्या अतिशय नॅचरल वाटतो . बाबूजीच्या रोल मध्ये कुलभूषण खरबंदा यांनी आपल्या लौकिकाला साजेसा अभिनय केलाय . विशेष उल्लेख करावा दिव्येंदु शर्मा चा . बिना विचार बंदुकीचा ट्रिगर ओढणे असू दे अथवा कुणाचाही मुलाहिजा ना बाळगणारा असा बंडखोर मुन्ना भैया दिव्येंदु ने मस्त साकारलाय. गुड्डू च्या भूमिकेत अली फझल , गजगामिनी उर्फ गोलू च्या रोलमध्ये -श्वेता त्रिपाठी , बिना च्या रोलमध्ये - रसिका दुग्गल यांच्या भूमिकाही उत्तम झाल्यात.बाकीच्या सहकलाकारांच्या भूमिका हि उत्तम झाल्यात पार्श्वसंगीत , सेट्स , छायाचित्रण या डिपार्टमेंट मध्येही कामगिरी उत्तम आहे.
ज्यांच्या प्लेलिस्ट मध्ये क्राईम ड्रामा चा समावेश असतो त्यांच्यासाठी दिवाळी मध्ये पाहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे . अर्थात ज्यांना हिंसाचार,खुन, शिवराळ भाषा याचा तिटकारा आहे त्यांनी सेरीजच्या वाटेला न गेलेलच बरं.